About the Organization:
Sakal - the flagship brand of the Sakal Media Group - was born on January 1, 1932 and has today evolved into the voice of the entire state of Maharashtra. "A newspaper is a medium of public education and of social change." This has remained our philosophy. Sakal has stewarded several social initiatives over the past several decades with many of the initiatives going beyond Sakal's own regional markets, addressing needs across the country. Social impact and social change remains the core of the Sakal's beliefs even today and with this Sakal is introducing its own Crowdfunding platform - Social For Action. We belief that the role of media today has changed from being an advocate of social causes to being the facilitator or the agent of social change itself.
Issue:
समाजाला मदतीचे आवाहन कोणत्याही मुलीसाठी तिचे वडील तिच्या आयुष्यातील पहिले हिरो असतात. प्रत्येक मुलीला आपले वडील आपल्याला कोणत्याही संकटापासून वाचवतील आणि संरक्षण देतील अशी खात्री असते. वडील आपल्या मुलीच्या प्रत्येक पावलावर तिच्यासोबत खंभीरपणे उभे असतात. असाच एक 'बाप' आपल्या मुलीच्या उपचारांसाठी धडपडत आहे. वांजरखेडा, ता. भालकी, जि. बिदर येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील महादेव मदे (वय ३९) नावाचा तरुण दहा वर्षांपूर्वी कामाधंद्याच्या शोधात पुण्यात आला. एका खाजगी सुरक्षा कंपनीच्या माध्यमातून कंत्राटी तत्वावर ठिकठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करू लागला. पुढे काही वर्षांनी लग्न झाल्यावर तो पुण्यात बावधन परिसरात भाड्याने खोली घेऊन राहू लागला. तीन वर्षांपूर्वी महादेवच्या संसारवेलीवर एक छान फुल उमलले. एका गोंडस मुलीचा जन्म झाला. पत्नी आणि मुलीसमवेत महादेव आनंदाने आणि गुण्या गोविंदाने आयुष्य जगत होता.
Action:
सर्व काही मजेत असताना मागील डिसेंबर (२०२५) महिन्यात महादेवची तीन वर्षीय मुलगी श्रुतिका घरात खेळताना अंघोळीकरिता गरम पाणी केलेल्या बादलीत पडली. पाणी जास्त गरम असल्याने श्रुतिका गंभीररीत्या ६५ टक्के भाजली असून, तिच्यावर वाकड येथील लहान मुलांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये मागील एका महिन्यापासून उपचार सुरु आहेत. श्रुतिका उपचारांना प्रतिसाद देत असून, आतापर्यंत उपचारांचा सोळा लाख रुपये खर्च आलेला आहे. कुटुंबाची व मुलीची कायम काळजी घेणाऱ्या व बारावी पर्यंत शिक्षण झालेल्या महादेवने आपल्या कुटुंबाचा दहा लाख रुपयांचा आरोग्य विमा काढला होता. आरोग्य विम्याची रक्कम संपली असून, उर्वरित खर्चासाठी महादेवने मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्याकडून तीन लाख रुपये उभे केले आहेत. श्रुतिका पूर्ण बरी होण्यासाठी तिच्यावर (त्वचा प्रत्यारोपण) प्लॅस्टिक सर्जरी करण्याची गरज आहे. पुढील उपचारांसाठी व शस्त्रक्रियेसाठी आणखी पंधरा लाख रुपयांची आवश्यकता आहे.
Impact :
आपल्या मुलीला बरं करण्यासाठी महादेव मागील एक महिन्यांपासून धडपडत आहे. आता पुढील उपचारांसाठी आणखी पंधरा लाख रुपये कसे उभा करायचे ? हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला आहे. सुरक्षारक्षकाची कंत्राटी नोकरी सोडली तर महादेवकडे स्वतःचे असे काहीच नाही. अशा परिस्थितीतही महादेव निराश न होता रोज विविध संस्था , लोकप्रतिनिधी व मंडळे यांच्याकडे जाऊन मदतीचे आवाहन करत आहे. आपल्या मुलीविषयी सांगताना महादेव सांगतो, " मी गरिबी परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ शकलो नाही. पण, मी माझे स्वप्न माझ्या मुलीमध्ये पाहत होतो. तिला पुढील वर्षी शाळेत घालण्याचे नियोजन केले होते. मुलीला चांगले शिक्षण देऊन खूप मोठं करण्याचा माझा प्रयत्न आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे कष्ट करण्याची माझी तयारी आहे. माझ्या मुलीला बरं करण्यासाठी मला समाजाने मदत करावी. "
Primary Cause :
गरम पाण्याने भाजलेल्या तीन वर्षीय मुलीच्या उपचारांसाठी वडिलांची धडपड
Project Location(s):
Pune
₹1,000
Parag Ashok Katariya
2026-01-12T06:36:59+00:00
₹1,000
Sameer Tikare
2026-01-11T22:54:50+00:00
₹1,000
Rakesh Bhandari
2026-01-11T21:34:10+00:00
₹1,000
Sachin Ghalme
2026-01-11T21:03:44+00:00
₹5,000
Sachin Shelar
2026-01-11T20:45:03+00:00
₹2,000
BIPIN RANA
2026-01-11T20:38:24+00:00
₹10,000
Santosh Chitrangad Kawade
2026-01-11T20:22:17+00:00
₹1,000
Suhas kisan sane
2026-01-11T16:23:49+00:00
₹1,000
Arun Gangadhar Kanade
2026-01-11T16:14:11+00:00
₹500
Sandip Asaram Gondhali
2026-01-11T16:00:45+00:00
No results have been found