About the Organization:
Sakal Social For Action Foundation
Issue:
हिंगणगाव (ता. इंदापूर , जि. पुणे) येथे संतोष कावरे (वय ४३) हा शेतकरी कुटुंबातील तरुण आई - वडील, पत्नी आणि दोन मुलांसमवेत वास्तव्यास आहे. संतोष हा अल्पभूधारक शेतकरी असून, शेती हेच कावरे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. संतोष शेतीबरोबरच गावात प्लम्बिंग आणि इलेक्ट्रीशियनची कामे करून कुटुंबाला हातभार लावत होता. शेतीच्या खरीप आणि रब्बी हंगामातून आलेले पीक नजीकच्या मार्केटमधील अडतींना विकून आलेल्या जेमतेम पैशातून संतोष आपल्या कुटुंबासह आनंदाने जगत होता. आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचे स्वप्न उराशी बाळगून विविध मार्गांनी मेहनत घेत होता. पण नियतीला हे मान्य नव्हते. आपल्या शेतीतील टोमॅटोचे पीक विक्रीसाठी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथील मार्केटला टेंम्पोने घेऊन जात असताना, टेंभुर्णी - कुर्डुवाडी मार्गावरील पिंपळनेर गावाच्या हद्दीत समोरून येणाऱ्या एका भरधाव कारने संतोषच्या टेंम्पोला धडक दिली. टेंम्पोमधील संतोषच्या दोन सहकारी शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला असून, संतोष गंभीररीत्या जखमी झाला आहे.
Action:
अपघातात संतोषच्या डोक्याला व पायाला गंभीर इजा झाली आहे. पाय जवळपास मोडला असून, अनेक ठिकाणी फॅक्चर झाले आहे. याशिवाय छातीच्या अनेक बरगड्या तुटल्या आहेत. संतोषवर पुण्यातील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. संतोषवर छातीच्या बरगड्यांची व पायाची अशा दोन शस्त्रक्रिया आणि उपचारांची गरज आहे. याशिवाय डोक्याच्या गंभीर दुखापतीवर सुद्धा उपचारांची आवश्यकता आहे. एकंदरती दोन शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचारांचा एकूण खर्च जवळपास पाच लाखांहून अधिक आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचारांचा मोठा खर्च संतोषच्या कुटुंबाला पेलणे अत्यंत कठीण झाले आहे. संतोषचा लहान भाऊ राजेंद्र कावरे पैशांची जमवाजमव करण्यासाठी झटत आहे. मित्र आणि नातेवाईकांनी मिळून एका दिवसात एक लाख चाळीस हजार रुपये जमा केले आहेत. आज संतोष कावरे यांना केवळ शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचारांचीच नव्हे, तर समाजातील अनेक दानशूर व्यक्तींच्या आणि संस्थांच्या मदतीचीही गरज आहे. आपली छोटीशी आर्थिक मदत संतोष यांच्यावरील उपचारांना मोठा आधार देऊ शकते आणि त्यांच्या कुटुंबाला या कठीण प्रसंगी उभे राहण्याचे बळ देऊ शकते. राजेंद्र कावरे म्हणतात की, "यंदा दुष्काळाची परिस्थिती असल्याने शेतीतून पुढे रब्बी हंगामातील काहीच उत्पन्न मिळणार नाही. एका शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर पुन्हा उभारण्यासाठी सामाजिक जाणिवेतून आणि माणुसकीच्या नात्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी आम्हला मदतीचा हात द्यावा, जेणेकरून संतोष आपल्या कुटुंबासाठी आयुष्यात पुन्हा उभारी घेईल."
Project Location(s):
Pune
₹1,000
Manjiri Sanjay Dixit
2026-10-06T12:29:09+00:00
₹500
Nanasaheb Hegade
2026-10-06T12:12:08+00:00
₹500
DEVKANT DATTATRAYA SHINDE
2026-10-06T12:01:27+00:00
₹10,000
adv yakub sahebu tadavi
2026-10-06T11:55:33+00:00
₹1,000
Shantanu Suryakar
2026-10-06T11:23:27+00:00
₹1,000
BABA GAWADE
2026-10-06T10:24:37+00:00
₹500
Pravin Bhambure
2026-10-06T10:22:49+00:00
₹3,000
Ravindra Mahadev Ghare
2026-10-06T10:14:23+00:00
₹5,000
Shubhada V Pardeshi
2026-10-06T10:13:03+00:00
₹500
Arvind Medhe
2026-10-06T10:11:03+00:00
No results have been found