Sakal Relief Fund Provides Over ₹80 Lakh in Assistance to Flood-Affected Schools

Sakal Relief Fund Provides Over ₹80 Lakh in Assistance to Flood-Affected Schools

पुणे, ता. (९) मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ व दक्षिण सोलापूर अशा पाच तालुक्यातील पूरग्रस्त भागातील जिल्हा परिषदेच्या ४१ आणि संस्था संचालित ३ माध्यमिक अशा एकूण ४४ शाळांना सकाळ माध्यम समूहातील 'सकाळ रिलीफ फंडा' कडून  ८० लाख १० हजार रुपयांचे मदतीचे धनादेश 'सकाळ' च्या संचालिका मृणाल पवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.

यावेळी 'सकाळ रिलीफ फंडा' चे विश्वस्त महेंद्र पिसाळ, 'सकाळ' च्या सोलापूर, अहिल्यानगर आणि सातारा आवृत्तीचे संपादक संभाजी पाटील व लाभार्थी शाळांचे शाळा प्रमुख व मुख्याध्यापक उपस्थित होते. 'सकाळ रिलीफ फंडा' दिलेल्या शाळानिहाय मदत निधीतून शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य, भौतिक साहित्य खरेदीसाठी, शाळा दुरुस्ती, वर्गखोल्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, इमारत छत दुरुस्ती, स्वच्छतागृह दुरुस्ती आणि सरंक्षण भिंत बांधकाम आदी कामे करण्यात येणार आहेत.

मागील वर्षी (सप्टेंबर २०२५) मध्ये मराठवाड्यातील धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये अतिवृष्टीने महापूर येऊन तेथील शेतकरी वर्गांबरोबरच सर्वसामान्यांचे जनजीवन प्रभावित झाले होते. त्याचबरोबर पावसामुळे आणि पुराच्या पाण्याने अनेक शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये शाळांचे शैक्षणिक व भौतिक साहित्य वाहून गेले होते. तसेच, शाळांच्या वर्गखोल्यांची पडझड व दुरावस्था झाली होती. पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी आपदग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा 'सकाळ रिलीफ फंडा' ने कायम ठेवत पूरग्रस्तांच्या मदतीकरिता माजाला मदतीचे आवाहन करण्यात आले होते.

पूरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडा' ला जनसामान्यांबरोबरच समाजातील सर्व स्तरातील आणि विविध क्षेत्रातील घटकांकडून प्रतिसाद मिळाला असून, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्था, गृहनिर्माण सोसायटी, नागरी पतसंस्था- क्रेडिट सोसायटी, सामाजिक संघटना, औद्योगिक कंपन्या, कामगार संघटना, माजी सैनिक असोसिएशन, सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, स्वयंसेवी संस्था, देवस्थान - मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, अन्नदान मंडळ, हास्ययोग परिवार व ज्येष्ठ नागरिक संघटना आदींनी मदत केली आहे.

तातडीची मदत :-

पूरग्रस्त भागातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी मदतीचा हात पुढे करून, तातडीची मदत म्हणून सुरुवातीला प्राथमिक टप्प्यात तातडीची मदत म्हणून दैनिक 'सकाळ' चे स्थानिक संपादक व बातमीदार यांच्या सहकार्याने धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील अनुक्रमे भूम, परांडा, माढा व मोहोळ तालुक्यातील १ हजार ३३४ आपदग्रस्त कुटुंबाना (किमान २० दिवस पुरेल असे) जवळपास ३५ टन जीवनावश्यक वस्तूंचे (अन्नधान्य) किटचे वाटप केले आहे. दुसऱ्या टप्प्यात १ हजार मुलांसाठी शालेय साहित्याचे वाटप केले आहे. यामध्ये स्कूल बॅग, कंपास बॉक्स , ६ वह्या प्रत्येकी, वॉटर बॉटल , लंच बॉक्स, चादर , सतरंजी, टॉवेल व स्वेटर अशा वस्तूंचा समावेश होता.

======================================================

चौकट :- १

शाळांची निवड :-

'सकाळ' चे स्थानिक संपादक व बातमीदार यांच्या सहकार्याने धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील अनेक शाळांचे मदतीसाठी 'सकाळ रिलीफ फंडा' कडे अर्ज आले होते. शाळांच्या नुकसानीची चौकशी करून मदतीसाठी अंतिम ४४ शाळांची निवड करण्यात आली

या शाळांना मिळाली मदत :-


धाराशिव जिल्हा

. परांडा तालुका

जि. प. प्रा. शाळा (पवारनगर),जि. प. प्रा. शाळा(देगावखुर्द), जि. प. प्रा. शाळा (सांगडेवस्ती), जि. प. प्रा. शाळा (तांदुळवाडी),जि.प.प्रा.शाळा(परांडा),जि.प.प्रा.शाळा(साकतबुद्रुक), जि. प. प्रा. शाळा (बुकी, जि. प. प्रा. शाळा (आवारपिंप्री), जि. प. प्रा. शाळा (वागेगव्हाण), जि. प. प्रा. शाळा (कपिलापुरी), जि. प. प्रा. शाळा (खानापूर), जि.प.प्रा. शाळा (कोकणेवस्ती), जि.प.प्रा. शाळा (शेळगाव), जि. प. प्रा. शाळा (अंदोरी), जि. प. प्रा.शाळा (हिंगणगावबु), जि. प. प्रा. शाळा (आलेश्वर), जि. प. प्रा. शाळा (भोत्रा), जि. प. प्रा. शाळा (घारगाव), जि. प. प्रा. शाळा (जवळा), जि. प. प्रा. शाळा (खंडेश्वरवाडी), जि. प. प्रा. शाळा (धोत्री), जि. प. प्रा. शाळा (ब्रम्हगाव), जि. प. प्रा. शाळा (देऊळगाव), जि. प. प्रा. शाळा (लोहारा), जि. प. प्रा. शाळा (उंडेगाव), जि. प. प्रा. शाळा (सिरसावा-पाटीलवस्ती), जि. प. प्रा .शाळा (कारंजा), जि. प. प्रा. शाळा (पाटील वस्ती -भोतरा), व माणिकबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (शेळगाव)

. भूम तालुका

जि. प. प्रा. शाळा (साडेसांगवी), जि. प. प्रा. शाळा (गिरवली), जि. प. प्रा. शाळा (अंधारेवस्ती), जि. प. प्रा.शाळा (माणकेश्वर), जि. प. प्रा. शाळा (हाडोग्री), जि. प. प्रा. शाळा (कानडी), जि. प. प्रा. शाळा (देवळाली), जि. प. प्रा. शाळा (हिवरा) व अंतरगाव हायस्कूल (अंतरगाव)

२. सोलापूर जिल्हा

. माढा तालुका

नवभारत विद्यालय (सीना दारफळ), जि. प. प्रा. शाळा(केवड), व जि. प. प्रा. शाळा (वाकाव)

. मोहोळ तालुका

जि. प. प्रा. शाळा (मलिकपेठ)

. दक्षिण सोलापूर तालुका

जि. प. प्रा. शाळा (संजवाड) व जि. प. प्रा. शाळा (शिंदखेड)

=================================================================

कोट :- १

Drop A Message To Us!