About the Organization:Sakal - the flagship brand of the Sakal Media Group - was born on January 1, 1932 and has today evolved into the voice of the entire state of Maharashtra. "A newspaper is a medium of public education and of social change." This has remained our philosophy.
Issue:आईचे किडनीसाठी दातृत्व, शस्त्रक्रियेसाठी ६ लाख रुपयांची आवश्यकता. आपला मुलगा किंवा मुलगी आपल्या म्हातारपणाची काठी व्हावी, असे प्रत्येक व्यक्तीची धारणा असते. आयुष्याच्या कातरवेळी उतारवयात मुलाने / मुलीने आपल्याला आधार द्यावा व आपले संरक्षण करावे, अशी प्रत्येक आई - वडिलांची भावना असते. पण, पुण्यातील एका ७० वर्षीय ज्येष्ठाला आपल्या तरुण मुलाच्या आयुष्यासाठी धडपड करावी लागत आहे. माधव येनपुरे (वय ७०) पुण्यातील कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरात आपल्या कुटुंबासहित राहत असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी ते रिक्षा चालवत. मुलगा मयूर (वय ४०) बदली वाहनचालक म्हणून काम करत होता. माधव येनपुरे यांच्या कुटुंबात पत्न्नी, मुलगा मयूर, सून व दोन नातवंडे असे एकूण सहा जण आहेत. मयूरचे काम कायमस्वरूपी नव्हते. त्यामुळे त्याची पत्नी परिसरातील काही घरांमध्ये घरकाम करून कुटुंबाला हातभार लावते. अडीच वर्षांपूर्वी अचानक मयूरला मूत्रपिंडाच्या (किडनी) आजाराने ग्रासले. रुग्णालयात सर्व तपासण्या केल्यानंतर समजले की, मयूरची एक किडनी पूर्णतः निकामी झाली असून, त्याच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होईपर्यंत मयूरला आठवड्यातून दोनवेळेस डायलिसिस करावे लागणार होते. आतापर्यंतच्या मयूरच्या उपचारांसाठी व औषोधोपचारांसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. यासाठी त्यांनी आपली स्वतःची रिक्षा देखील विकली.
Action:आईचे दातृत्व :-डोळ्यासमोर आपल्या मुलाला होणाऱ्या वेदना मयूरच्या आईला (मीना येनपुरे वय ६३) पाहवत नव्हत्या. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दात्याची आवश्यकता होती. आई आणि मुलाची किडनी जुळण्याची शक्यता असते आणि हे मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी एक महत्त्वाचे नाते असून आई मुलासाठी किडनी दान करू शकते, हे कळल्यानंतर आणि पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात सर्व तपासण्या झाल्यानंतर मीना येनपुरे आपल्या मुलाला किडनी देण्यास तयार झाल्या.किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी एकूण अकरा लाख रुपयांचा खर्च होता. येनपुरे कुटुंबाने कमी उत्त्पन्न गटातील सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर शासकीय योजनेतून मयूरच्या शस्त्रक्रियेसाठी पाच लाख रुपये मंजूर झाले. पण, उर्वरित सहा लाख रुपये कसे उभे करायचे ? हा माधव येनपुरे यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.येनपुरे मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्याकडून काही रक्कम गोळा करत असून, मिळणारी मदत अतिशय तुटपुंजी आहे. रिक्षा आधीच मुलाच्या उपचारांसाठी विकल्याने आता त्यांच्याकडे विकण्यासाठी व उत्पन्नाचे दुसरे कोणतेच साधन नाही. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक रक्कम येनपुरे यांच्याकडे जमा झाल्यावर मयूरवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
चौकट :- १'मयूरच्या' शस्त्रक्रियेसाठी अशी करा मदत...'सकाळ' च्या 'सकाळ सोशल फॉर ॲक्शन फाउंडेशन' अभियानांतर्गत 'मयूर येनपुरे' या चाळीस वर्षीय तरुणाच्या मदतीसाठी समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या, औद्योगिक कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक
https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन, 'मयूर येनपुरे' या तरुणाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.किंवा खालील बँक खात्यात ऑनलाइन देणगी पाठवू शकता.देणगी बँक खात्यात ट्रान्सफर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हाट्सअँप नंबर वर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.Name :- Sakal Social For Action FoundationBank Name : IDBI BankA/C No : 0459102000022279IFSC Code : IBKL0000459
टीमSFA
support@socialforaction.comअधिक माहितीसाठी संपर्क:- ८६०५०१७३६६-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चौकट :- २'समर्थ रणनवरे' पूर्णतः बरा'सकाळ सोशल फॉर ॲक्शन फाउंडेशन' अभियानांतर्गत 'समाजभान' सदरात उच्च दाबाच्या विजेच्या धक्याने गंभीर भाजलेल्या जेजुरी येथील 'समर्थ रणनवरे' या चौदा वर्षीय मुलाच्या उपचारांसाठी मदत मिळावी म्हणून अभियान राबविण्यात आले होते. समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हातांनी मदत केल्यामुळे समर्थवर यशस्वी उपचार करता आले. आता समर्थ पूर्णतः बरा आहे.चौकट :- ३'सकाळ सोशल फॉर ॲक्शन फाउंडेशन ' अभियानाद्वारे अनेकांना मदतीचा हात !तीन वर्षात २३ संस्थांना मदत'सकाळ' च्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांसाठी राबविण्यात येणाऱ्या 'सकाळ सोशल फॉर ॲक्शन फाउंडेशन ' अभियानांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांशी निगडित असलेल्या समस्या लोकसहभागाच्या व कंपनी 'सीएसआर' च्या सहकार्याने दूर करून ग्रामविकास साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याशिवाय व्यक्तिगत देणगीदार आणि सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) स्वीकारणाऱ्या आस्थापनांना एकत्र आणून महाराष्ट्रात चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमांना निधी उपल्बध करून देण्यासाठी अभियान राबविण्यात येते.मागील तीन वर्षात 'सकाळ सोशल फॉर ॲक्शन फाउंडेशन' अभियानांतर्गत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या २३ स्वयंसेवी संस्थांचे व आठ गरजू व्यक्तींना वैद्यकीय मदतीसाठीचे अभियान पूर्ण केले आहे. तसेच, अभियानाच्या माध्यमातून जमा झालेला निधी त्या-त्या संस्थांना वर्ग केला आहे.
Project Location(s):Pune