Tax Benefits Non-Profit(NGO)

Tejas, a 24-year-old accident victim, needs a helping hand.

Tejas Ashok Nalawade
5%
Goal:
₹1,000,000
Donations:
31
Raised:
₹58,003
Campaigner Details
Verified

Tejas Ashok Nalawade

Beneficiary Details
Verified

Tejas Ashok Nalawade

Ask an Update

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे तेजस अशोक नलवडे हा चोवीस वर्षीय तरुण आपले आई - वडील आणि भावासमवेत वास्तव्यास आहे. अशोक नलवडे एका खाजगी वाहनावर (पिकअप) वाहनचालक म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशोक नलवडे यांना दोन मुले, पत्नी आणि पुसेगावातील राहते घर हीच त्यांची संपत्ती. मोठा मुलगा प्रशांत अर्धवेळ काम करून आपले पदवीचे (बीएसस्सी) बाहेरून शिक्षण पूर्ण करत आहे, तर लहान मुलगा तेजस सुद्धा बाहेरून पदवीचे (बीए) शिक्षण घेत आहे.नलवडे कुटुंबाला वडिलोपार्जित शेती किंवा उत्पानांचा दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे तेजस मिळेल ते काम करून आपल्या वडिलांना मदत करण्याच्या सतत प्रयत्न करायचा. कोणतीही तक्रार न करता आलेल्या प्रसंगाला तोंड देत नलवडे यांचे कुटुंब गावात गुण्यागोविंदाने राहत होते. मागील पाच दिवसांपूर्वी मोटरसायकलवरून साताऱ्यावरून परतत असताना तेजसचा गाडी घसरून रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळल्याने गंभीर अपघात झाला.
अपघातात तेजसच्या डोक्याला मार बसून कवटीला, डोळ्याच्या बाजूंच्या हाडांना आणि जबड्याच्या हाडांना गंभीर आघात होऊन फ्रॅक्चर झाले आहे. याशिवाय रक्तस्त्राव झाल्याने कवटीत रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. सातारा येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये तेजसवर मागील पाच दिवसांपासून उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एक लाख एकाहत्तर हजार रुपयांचा खर्च झाला असून, तेजसवर दोन - तीन शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यामध्ये रक्ताच्या गुठळ्या काढणे , डोळ्याच्या बाजूकडील हाडांची आणि जबड्याच्या तुटलेल्या हाडांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.तेजसवर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी आठ लाख रुपयांचा खर्च आहे. कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी मिळून आतापर्यंत एक लाख एकाहत्तर हजार रुपये जमा करून पाच दिवसांचा उपचारांचा खर्च भागविला आहे. शस्त्रक्रियेच्या आणि उपचारांची खर्चाची रक्कम गोळा करण्यासाठी अशोक नलवडे, तेजसचा मोठा भाऊ प्रशांत रात्रंदिवस झटत आहेत.प्रशांत नलवडे म्हणतात की, "माझा भाऊ जीवन - मरणाची लढाई लढत असून, जगण्यासाठी धडपडत आहे. त्याच्या प्रयत्नाला बळ देण्यासाठी समाजाने आम्हला मदतीचा हात द्यावा, जेणेकरून तेजसच्या आयुष्याला पुन्हा उभारी मिळेल. "
रस्ते अपघातांचे वास्तव :-भारतात दरवर्षी रस्ते अपघातात सुमारे १.७७ लाख लोकांचा मृत्यू होतो आणि ४.६ लाखांहून अधिक लोक जखमी होतात. सर्व मृत्यूंपैकी जवळपास ६८ ते ७० टक्के मृत्यू हे अतिवेगामुळे होतात.सुरक्षा साधनांचा वापर न करणे: दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरल्यामुळे ५४ हजारांहून अधिक, तर कार चालवताना सीटबेल्ट न लावल्यामुळे हजारो जीव जातात.
'तेजसला' अशी करा मदत...समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्था https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन, 'सकाळ सोशल फॉर ॲक्शन फाउंडेशन' अभियानांतर्गत 'तेजस नलवडे' या तरुणाची माहिती घेऊन संस्थेच्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल. याशिवायखालील बँक खात्यात किंवा सोबतचा क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाइन देणगी पाठवू शकता. देणगी ट्रान्सफर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हाट्सअँप नंबरवर ट्रान्सझॅक्शनचे तपशील पाठवावेत.

स्वयंसेवी संस्थांना आवाहन'सकाळ सोशल फॉर अ‍ॅक्शन फाउंडेशन' या ऑनलाइन क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्मद्वारे आतापर्यंत महाराष्ट्रातील २४ स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या सामाजिक उपक्रमांसाठी आणि १० व्यक्तिगत लोकांना वैद्यकीय शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी मदत मिळवून देण्यात आली आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, ग्रीन एनर्जी, जलसंधारण , कौशल्ये प्रशिक्षण , ग्रामविकास आणि नागरिकांशी निगडित समस्यांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी https://socialforaction.com/ ही लिंक ओपन करून, स्टार्ट अ फंडरेझर सेक्शन मधील एनजीओ विभागातील फॉर्म भरून आपल्या संस्थेची माहिती पाठवावी.

Pranesh Madhav Bhat
₹3,000
Pranesh Madhav Bhat 2026-08-23T09:52:57+00:00
Surekha Gilbile
₹3,000
Surekha Gilbile 2026-08-23T09:41:55+00:00
Mahesh Shashikant Bhise
₹500
Mahesh Shashikant Bhise 2026-08-23T09:36:09+00:00
Niranjan Purohit
₹5,000
Niranjan Purohit 2026-08-23T09:36:26+00:00
Atul Sudhakar Pawar
₹1,000
Atul Sudhakar Pawar 2026-08-23T09:28:03+00:00
Rahul Arvindrao Jot
₹1,000
Rahul Arvindrao Jot 2026-08-23T09:15:39+00:00
Jayashree Narkhedkar
₹5,001
Jayashree Narkhedkar 2026-08-23T08:56:56+00:00
Nilesh R Pardeshi
₹1,000
Nilesh R Pardeshi 2026-08-23T08:55:39+00:00
Manasi Narkhedkar
₹1,001
Manasi Narkhedkar 2026-08-23T08:48:49+00:00
Chandrakant J. Chaudhari
₹500
Chandrakant J. Chaudhari 2026-08-23T08:09:50+00:00


No results have been found

Bank Name : IDBI Bank

A/C Holder Name : Sakal Sakal Social For Action Foundation Foundation

A/C No : 0459102000022279

IFSC Code : IBKL0000459

Bank Address : IDBI Bank Govind Vilas Building, Shukrawar Peth Bajirao Road Pune Maharashtra - 411002

Every social media share can bring ₹5,000

Certificates & Tax Exemption

Donations to this NGO have 50% tax exemption for Indian donors.

Top Influencers

Pranesh Madhav Bhat
₹3,000
Pranesh Madhav Bhat Sunday 23rd of August 2026 09:52:57 AM
Surekha Gilbile
₹3,000
Surekha Gilbile Sunday 23rd of August 2026 09:41:55 AM
Mahesh Shashikant Bhise
₹500
Mahesh Shashikant Bhise Sunday 23rd of August 2026 09:36:09 AM

Recent Donation

Pranesh Madhav Bhat
₹3,000
Pranesh Madhav Bhat 2026-08-23T09:52:57+00:00
Surekha Gilbile
₹3,000
Surekha Gilbile 2026-08-23T09:41:55+00:00
Mahesh Shashikant Bhise
₹500
Mahesh Shashikant Bhise 2026-08-23T09:36:09+00:00

Related Campaigns

Take a look at other campaigns in the same category.

Drop A Message To Us!